EVENT DETAILS

संस्कृत स्तोत्र पाठांतर स्पर्धा २०२६

01 Aug 2026 2 days
संस्कृत स्तोत्र पाठांतर स्पर्धा २०२६

Date

01 Aug 2026

Time

2 days

Venue

आनंदाश्रम संस्था, पुणे

आनंदाश्रम

आनंदाश्रम संस्था, पुणे गेली १६ वर्षे सातत्याने 'संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितिः' या ब्रीदाला अनुसरणारा — संस्कृत स्तोत्र पाठांतर, प्रश्नमंजूषा, नाट्यवाचन, कथाकथन, नियोजित वक्तृत्व इ. विविध स्पर्धांच्या आयोजनाचा उपक्रम राबवत आहे.

या वर्षी १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी स्पर्धा झाल्या व ६ ऑगस्ट रोजी बक्षीस समारंभ साजरा झाला.

यंदाच्या वर्षी मा. स. गोळवलकर, अहिल्यादेवी, D.E.S., N.E.M.S., जी. जी. इंटरनॅशनल, नवीन मराठी, भारतीय विद्या भवन परांजपे विद्यामंदिर, भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्यामंदिर, ज्ञानप्रबोधिनी, रमणबाग, न्यू इंग्लीश स्कूल टिळक रोड इ. जवळजवळ १३ शाळांमधील ५२५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

विविध स्पर्धांमध्ये मिळून जवळजवळ ९५ पारितोषिके संस्थेने दिली. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम व सर्टिफिकेट असे होते.

तसेच सर्वाधिक पारितोषिके मिळविणाऱ्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाला सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली.